मोहोळ: कामती येथील शिवाजी चौकात पूर्व वैमनस्यातून एकावर जीवघेणा हल्ला, शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल
Mohol, Solapur | Sep 14, 2025 कामती येथील शिवाजी चौकात शनिवारी दुपारी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौघांनी मिळून तरुणास सळई तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याची माहिती सिविल पोलिसांनी आज रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे. मारहाण झालेल्याचे नाव भिमाशंकर रावसाहेब म्हमाणे (वय ३८, रा. कोरवली, ता. मोहोळ) असे आहे. काही दिवसांपूर्वी कामती येथील शिवाजी चौकात भिमाशंकर आणि शुभम शेंडे यांच्यात वाद झाला होता.