दिनांक 19 नोव्हेंबर रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात एका माजी कंत्राटी कर्मचाऱ्याने अचानक केलेल्या तोडफोडीने सायंकाळी 7 वाजता एकच खळबळ उडाली. अनुभव प्रमाणपत्र न मिळाल्याच्या संतापातून त्याने रुग्णालयातील वस्तूंची तोडफोड केली, याची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी धावत घेत परिस्थिती हाताळली आणि संबंधित युवकाला ताब्यात घेतले.