हातकणंगले: इचलकरंजीत पाणीप्रश्नी निर्णय न झाल्यास जनआंदोलनाचा नागरिक मंचने दिला इशारा
इचलकरंजी शहरातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर अद्याप ठोस उपाययोजना न झाल्यास येत्या एका महिन्यात जनआंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा इचलकरंजी नागरिक मंचने दिला आहे.आज मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला.मंचाचे अभिजित पटवा यांनी संताप व्यक्त करत म्हणाले की,शहरातील नागरिक अनेक वर्षांपासून पाण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत.