पालघर: नायजेरियन नागरिकाच्या हत्या प्रकरणी दोन नायजेरियन नागरिकांना अटक; नालासोपारा येथील घटना
नालासोपारा येथे शुल्लक वादातून डोक्यात काचेची बाटली फोडून मारहाण करून एका नायजेरियन नागरिकाचे हत्या करण्यात आली. लकी उईजे असे मृत नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत अयुला बर्थ लोन, ओघेने इगेरे या दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. ओडिया पेफ्युलिअर हा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. तीनही आरोपी विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.