अंजनगाव सुर्जी: कविटकर मंगल कार्यालय येथे भाजपा चा कार्यकर्ता मेळावा;पालकमंत्री चन्द्रशेखर बावनकुळे उपस्थित
अंजनगाव सुर्जी शहरातील कविटकर मंगल कार्यालय येथे आज सायं ६ वाजता भारतीय जनता पार्टी चा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकसंदर्भात हा मेळावा अंजनगाव सुर्जी व दर्यापूर भाजपच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला.