''पाणी प्रश्नात कुणी राजकारण आणू नये, आणि कुणी आम्हाला धमक्याही देऊ नये. शंभर गुन्हे दाखल केले तरी आम्ही धमक्यांना घाबरत नाही !'' अशा शब्दात भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना गुरूवारी ८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता प्रत्युत्तर दिले. तर पिंटू कोठारी यांनी आपण शहर हिताच्या कामासाठी सोबत असल्याचे नमूद केले.