नागपूर ग्रामीण: नागपुरात जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
शहरात एका बँकेच्या बैठकीदरम्यान गंभीर प्रकार समोर आला असून, तक्रारदार पंकज निळकंठराव भान्से यांनी बँक पदाधिकाऱ्यांवर जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिलयाचा आरोप केला आहे. बैठकीत सर्वांसमोर अपमानित करून धमकी दिल्याचा दावा भान्से यांनी केला आहे. याचे ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना सादर करण्यात आले आहे. दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी न्यायाची मागणी केली आहे