जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवकांमध्ये एचआयव्ही/एड्स विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अलिबाग येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनारा कमानी परिसरातून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीचे आयोजन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबागमार्फत करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.किरण शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रवीण कंदाडे, एचओडी पीसीएम नाझिया, एचओडी एसएमटी डॉ. साक्षी पाटील, दालसा मुख्य ऍड. सी. सी. कामथे, लायन्स क्लब श्रीबाग सेन्टिनियलच्या अध्यक्षा निहा घरत, ॲड. निहा राऊत, ॲड. अंकित बंगेरा आदी मान्यवर उपस्थित होते.