कल्याण: डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा उघड
Kalyan, Thane | Oct 3, 2025 डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आला आहे. शंभराहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून चार आरोपींना ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत या आरोपींना 6 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून इतर चार आरोपीचा शोध सुरू आहे. या संदर्भात तक्रारदारांचे वकील संग्राम पाटील यांनी आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 1च्या सुमारास माहिती दिली आहे.