समुद्रपूर: मोहगाव जंगलाशेजारी वाघाच्या हल्लात गोरा ठार, शेतकऱ्याचे ३० हजार रुपयांचे नुकसान
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव येथे जगला शेजारी चरत असलेल्या गोऱ्यावर हल्ला चढवित जागीच ठार केले. प्राप्त माहितीनुसार मोहगांव येथील शेतकरी अनिल धोटे यांचे जनावरे जंगला शेजार चरत असताना झुडपात दबा धरून असलेल्या वाघाने एका गोऱ्यावर हल्ला चढवित जागीच ठार केले. या घटनेची माहिती शेतकऱ्याने गिरड येथील वनविभागाला देताच वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक कोंडबा गुडप्पा वनमजूर भाऊराव नागोसे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.