संत शिरोमणि गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने कामठी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जय भीम चौक, कामठी येथील ज्वाला माता मंदिर परिसर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या प्रसंगी संत शिरोमणि गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.