पातुर अकोला रोडवरील हिंगणा फाटा महामार्गावर एका चार चाकी वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.या अपघातात चारचाकीतील 12 प्रवासी जखमी झाले असून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तत्काळ अकोल्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.