नांदगाव खंडेश्वर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती चांदुर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा
आज १५ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी साडे तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पंचायत समिती चांदुर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा आमदार प्रताप अडसड यांच्या अध्यक्षतेत पार पडली. ग्रामविकास, लोकसहभाग आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर यावेळी चर्चा झाली. या कार्यशाळेला गटविकास अधिकारी, शासकीय अधिकारी, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक, पंचायत समिती कर्मचारी, पत्रकार बांधव, भाजप पदाधिकारी व मान्यवर मोठ्या....