अलिबाग: रायगड निवडणुकीसाठी सज्ज! जिल्ह्यात आचारसंहिता लागू
१० नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
बॅनर हटवण्यास सुरुवात
Alibag, Raigad | Nov 5, 2025 निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, श्रीवर्धन आणि महाड या दहा नगरपरिषदांच्या सदस्य आणि अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, सर्व संबंधित विभागांनी तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.