सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने भरीव तरतूद केली आहे. मात्र जिल्ह्यात काही मंडळांचा नुकसान भरपाईत समावेश नसल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत शासनकडे पाठपुरावा करून या मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे. या संदर्भात आज बुधवारी शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे आता वंचित असलेल्या वीस मंडळातील शेतक-यांनी राज्य शासनाची मदत मिळणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल