उत्तर सोलापूर: विजापूर रोड परिसरातील मंदिर चोरटे १२ तासांत जेरबंद, सोलापूर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी...
सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील दोन मंदिरांमध्ये झालेल्या चोरीचा पर्दाफाश करत सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत चोरट्यांना जेरबंद केले. या कारवाईत देव-देवतांच्या ८ पंचधातूच्या मूर्ती व रोकड मिळून एकूण १ लाख ६५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० या वेळेत विजापूर रोडवरील बाहुबली नगर येथील बाहुबली जैन मंदिरातून पंचधातूच्या मूर्ती व रोकड असा एकूण १ लाख ७३ हजारांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरला होता.