साक्री: कांदा उत्पादक संघटनेचे "फोन करो आंदोलन" तापले;साक्री तालुक्यातून लोकप्रतिनिधींना फोन लावून विचारला जातोय जाब
Sakri, Dhule | Sep 14, 2025 महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या "फोन करो आंदोलनाने" राज्य शासनाला हादरा दिला आहे.संघटनेचे धुळे जिल्हा युवा अध्यक्ष गंगाधर शिंदे यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन केला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट व्हाट्सअप मेसेज पाठवला. त्यावर स्वतः कृषिमंत्री महोदयांनी तातडीने फोन करून चर्चा केली. या चर्चेत गंगाधर शिंदे यांनी स्पष्ट शब्दात मांडले की, कांदा प्रश्न केवळ केंद्र सरकारवर ढकल