अकोल्यात दिवाळीच्या काळात चोरीची घटना, सैनिकाच्या घरातून साडेचार लाखांचा ऐवज लंपास दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. अकोला शहरातील उमरी भागात चोरट्यांनी सैनिकाच्या घराला लक्ष्य करत सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, घरातील कुटुंबीय हे लग्नप्रसंगासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधत दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.घरातून अंदाजे 30 ग्राम सोन्याचे दागिने, 50 हजार रुपयांची रोकड लंपास केली