भाजप नेहमी हिटलरशाही पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून, सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जातात. भाजप हे 'ड्रायक्लिनर मशीन' आहे, ज्यामध्ये भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश देऊन त्यांना साफ करून घेतले जाते, असा गंभीर आरोप स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करूणा मुंडे यांनी केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजिंठा विश्रामगृह येथे शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता येथे बोलत होते.