जालना: जालन्याच्या विविध प्रश्नांवर विधानसभेत आक्रमक भूमिका; आमदार अर्जुन खोतकरांचा शेतकरी व शिवसैनिकांकडून सत्कार
Jalna, Jalna | Jul 4, 2026 जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात जालना शहर व जिल्ह्याशी संबंधित विविध प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल शहरातील विविध सामाजिक संघटना, शेतकरी, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी दर्शना बंगल्यावर त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अधिवेशनात आमदार खोतकर यांनी खरपुडी नवनगर सिडको प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजपुरवठा, भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, ठेवीदारांची फसवणूक तसेच वाढती बाल गुन्हेगारी यांसारखे जनते