क्रीडा संस्कृती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम जागविण्यासाठी जिल्ह्यात 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धा व व्याख्यानाचे आयोजन करुन क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आला.