गडचिरोली: “धार्मिक सत्संगातून संस्कारमूल्यांची जपणूक आवश्यक” –मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे प्रतिपादन
मौजा-कुष्णनगर येथे श्री.श्री. ठाकुर अनुकुलचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून श्री. ठाकुर अनुकुलचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.