चंद्रपूर: तुकुम येथे ६० लाख रुपयांत तयार होणार सांस्कृतिक सभागृह; आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन
तुकूम येथील हनुमान मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक सभागृहासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी तब्बल ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. श्रद्धा, संस्कार आणि एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या परिसरात उभारण्यात येणाऱ्या सभागृहामुळे विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना योग्य व्यासपीठ मिळणार आहे. येणाऱ्या पिढ्यांना आपली परंपरा, संस्कृती आणि मूल्ये जपण्यासाठी हे सभागृह एक भक्कम दालन ठरेल, असे प्रतिपादन आमदार जोरगेवार यांनी केले.