पाचोरा: सातगाव डोंगरी ढगफुटी सदृश्य परिस्थिती, नुकसानग्रस्तांना एक लाख रुपये मदत - आमदार किशोर पाटील यांची माहिती,
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे मध्य रात्री ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी संपूर्ण पाहणी करत मदतीसाठी तात्काळ पंचनामे करून घेतले व लगेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना संपर्क साधून नुकसानग्रस्त प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी एक लाख रुपये मदत मिळवुन देण्यात आली, स्थानिक नागरिकांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेता तात्काळ वैयक्तिक मदत करण्याचे देखील आश्वासित केले,