चांदूर बाजार: वृक्ष लागवड साईट बंद केल्याने मजुरांची उपासमार, पाळा येथून छत्रपती मैत्री संस्थेचे अध्यक्ष यांचा आंदोलनाचा इशारा
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवड करणाऱ्या मजुराच्या साईट बंद केल्यामुळे, शंखनाद करून ठिय्या आंदोलनाचा इशारा छत्रपती मैत्री संस्थेचे अध्यक्ष श्रणित राऊत यांनी प्रशासनाला दिला असून आज दिनांक 15 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पाळा येथून प्रसिद्धी माध्यमाला माहिती देऊन वृक्ष लागवड करणाऱ्या मजुरांच्या समस्या घेऊन डमरू बजावो,घंटानाद करून मोर्शी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे माहिती देताना सांगितले