पुणे शहर: हडपसरमध्ये दिवसाढवळ्या गाडीफोड; ४० हजारांचा ऐवज लंपास.
Pune City, Pune | Sep 17, 2025 हडपसरमध्ये दिवसाढवळ्या गाडीफोड; ४० हजारांचा ऐवज लंपास. पुणे द्राक्ष संशोधन केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज दुपारी झालेल्या गाडीफोडीत चोरट्यांनी तब्बल ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. फिर्यादी व त्यांचा भाचा हे बल्कर गाडी घेऊन सिमेंट डिलिव्हरीसाठी जात असताना दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्यांनी गाडीच्या टायरची हवा तपासण्यासाठी रस्त्याकडेला थांबवली. त्याचवेळी अज्ञात इसमाने गाडीतील ३० हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन असा मिळून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.