घरमालक बाहेरगावी गेलेले असताना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १ लाख ९३ हजार १८३ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान साईगीता नगरमध्ये घडली. या प्रकरणी शनीवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.