कामठी येथील प्रोफेसर कॉलनी, रनाळा भागात नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य श्री गणेश मंदिरात विविध देवदेवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २४ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. श्री गणेश मंदिर सेवा समितीच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मंदिरात श्री गणपती बाप्पांसोबतच दुर्गादेवी, श्री दत्तात्रय भगवान, राधा-कृष्ण, साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज, शिवलिंग, रामदरबार आणि हनुमानजी अशा अनेक देवतांच्या मूर्तींची स्थापना केली.