जिल्ह्यातील नद्यांना पूर आल्याने 03 लाख हेक्टर वरील खरीप पिके पाण्यात गेली, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी
Beed, Beed | Sep 16, 2025 बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून दिला. प्रचंड विध्वंस पाहण्यास मिळाला. १६ मध्यम, १२७ लघू प्रकल्प ओसंडून वाहू लागले. सर्वच नद्या, नाल्यांना महापूर आला. बंधारे फुटले, नदीचे पाणी शेतात घुसले, शेकडो गावांची वाहतूक ठप्प झाली. पावसाच्या रौद्ररूपाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तब्बल तीन लाख हेक्टरवरील खरीप हंगाम पाण्यात बुडाला. काढणीला आलेले सोयाबीन उद्धवस्त झाले. हातातोंडाशी आलेला कापसाचा घास नेस्तनाबूत झाला. आष्टी तालुक्यात कांद्याचा चिखल झाला. बाजऱ्यांचे कणसं पाण्यात वाहून गेले.