नागपूर ग्रामीण: विदर्भात १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान; शासनाला नोटीस
विदर्भातील भीषण उन्हाळा लक्षात घेता १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावर सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. कडाक्याच्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब अधोरेखित करत या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.