गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी 27 डिसेंबरला दुपारी 05:30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवाशाला लुटणाऱ्या आटोचालकाला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.