जालना: संघर्षाला अखेर यश; मराठा महासंघाच्या पाठपुराव्यामुळे जालना जिल्हा रुग्णालयातील एमआरआय मशीन सुरू
Jalna, Jalna | May 13, 2026 जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत पडून असलेले एमआरआय (MRI) मशीन अखेर कार्यान्वित करण्यात आले असून, या यशामागे मराठा महासंघाच्या सातत्यपूर्ण संघर्षाची मोठी भूमिका असल्याची भावना व्यक्त होत आहे. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी मराठा महासंघाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला अखेर निर्णय घ्यावा लागला. जिल्हा रुग्णालयातील एमआरआय मशीन धूळ खात पडून असल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन हजारो रुपये खर्च करून तपासण्या कराव्या लागत