जत: जगप्रसिद्ध गायिका उषाताई मंगेशकर जत मध्ये येणार, राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन
Jat, Sangli | Sep 24, 2025 जगप्रसिद्ध गायिका उषाताई मंगेशकर या जत मध्ये येणार असल्याची माहिती संजयराव कांबळे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली यामध्ये त्यांनी राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन केले असून समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जाणार असून हा पुरस्कार देण्यासाठी उषाताई मंगेशकर या मंगेश कर कुटुंबातून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते सर्व पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले