गडचिरोली: आदिवासी समाजाचा रोष,आ.शरद सोनवणे यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी,
गडचिरोली, ३१ जुलै: जुन्नूरचे आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांच्याविषयी अर्वाच्य भाषा वापरल्याच्या प्रकरणावरून आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि जंगोरायताड महिला संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यामध्ये आ. सोनवणे यांच्यावर SC/ST अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्या