नागपूर शहर: फुटाळा तलाव येथे युवकाचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ ; हत्या की आत्महत्या पोलिसांचा तपास सुरू
नऊ नोव्हेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीतील फुटाळा तलाव येथे एका युवकाचा मृतदेह आढळला. अचानक फुटाळा तलावात मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान ही हत्या आहे की आत्महत्या या चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी मृतदेह तलावाच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे.