स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी गती दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजुरा तालुक्यातील मौजा पाचगाव आणि भेंडवी येथे आज दि 1 नोव्हेंबर ला 12 वाजता पंचायत समिती सर्कल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडल्या.