11 जानेवारीला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने सापळा रचून फैयाज अन्सारी याला अटक केली आहे. आरोपीकडे एक लोखंडी चाकू आणि चोरीची पल्सर दुचाकी मिळून आली. आरोपीने दुचाकीचा क्रमांक बदलून ती वापरत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी एकूण २५,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.