हवेली: पावसामुळे थेऊर येथे घरात अडकलेल्या १५० नागरिकांची सुखरूप सुटका
Haveli, Pune | Sep 15, 2025 शहर आणि जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे हवेली तालुक्यातील थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरात ओढ्याला पूर आला. पुरामुळे जवळपास १५० लोकांच्या वस्तीत पाणी शिरले.या घटनेनंतर पीएमआरडीएच्या वाघोली अग्निशमन केंद्रातील जवान आणि पीडीआरफ पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने समन्वित कारवाई करत घरांमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले.