जालना: चोरीच्या संशयावरून कुटुंबाला मारहाणीचा आरोप; पारध पोलिसांविरोधात पालकांचे आमरण उपोषण
Jalna, Jalna | Apr 15, 2026 जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या संशयावरून एका कुटुंबाला व त्यांच्या विधी संघर्षग्रस्त बालकाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाच्या निषेधार्थ संबंधित कुटुंबाने तब्बल 130 किलोमीटर पायी प्रवास करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीर्थक्षेत्र जाळीचादेव येथील रहिवासी रेखा गायकवाड व त्यांचे पती उपोषणाला बसलेत.