जळगाव: ‘कौशल्यवृद्धी’ योजनेत गैरप्रकार: ठेकेदारावर कारवाईची मागणी; कामगारांचे सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
जळगाव जिल्ह्यात ‘कौशल्यवृद्धी अंतर्गत पूर्व शिक्षण’ या योजनेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप करत, बांधकाम कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. या गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपूरे व कामगार यांनी आंबेडकर मार्केट येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यासमोर मंगळवारी १६ सप्टेंबर दुपारी १२ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.