अंजनगाव सुर्जी: आशा नगर,स्वप्ननगरीतील घरफोडी प्रकरणात शकील डॉन टोळीचा सदस्य अटक;न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
अंजनगाव सुर्जी शहरात वाढलेल्या घरफोड्यांच्या तपासात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बुलढाणा येथील शकील डॉन टोळी शहरातील बंद घरांना लक्ष्य करून घरफोड्या करत असल्याचे उघड झाले आहे.अखेर अंजनगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे या टोळीतील एका सराईत चोरट्याला अटक करण्यात यश मिळवले आहे.अंजनगाव शहरातील आशा नगर,स्वप्न नगरी परिसरात दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दोन बंद घरांमधून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. पीडित महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल