माण: धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी माण तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Man, Satara | Sep 26, 2025 अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने जालना येथे दीपक बोहाडे यांनी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्याबरोबरच धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता माण तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, स्वातंत्र्य काळापासून संविधानानुसार धनगर समाजास मिळालेले एसटी प्रवर्गाचे आरक्षण दिले गेले नाही.