खामगाव: कदमापूर येथे दारू साठी पैसे न दिल्याने एकास मारहाण
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजे दरम्यान कदमापूर येथे उघडकीस आली आहे .या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसानी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सुनील भिकाजी इंगळे वय ४२ रा. कदमापुर यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.