जालना: जालना एमआयडीसीत अवैध शस्त्र बाळगणारा जेरबंद; तलवार व कोयता जप्त; चंदनझीरा पोलीसांची कारवाई
Jalna, Jalna | Apr 13, 2026 जालना एमआयडीसी परिसरात अवैधरीत्या धारदार शस्त्रे बाळगणार्या एका युवकास चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली असून त्याच्याकडून तलवार व कोयता जप्त करण्यात आला आहे. सोमवार दि. 13 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास एमआयडीसी भागात एक इसम अवैधरीत्या धारदार शस्त्रे बाळगून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने तत्काळ त्रिमूर्ती चौक परिसरात जाऊन संशयितास ताब्यात घेतले.