उत्तर सोलापूर: अतिवृष्टीत सापडलेल्या जनतेला मदत करा, भाजपच्या भ्रष्टाचाराचा फर्दाफाश करा: खासदार प्रणिती शिंदे यांचे आवाहन...
आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायं 5 वाजता काँग्रेस भवनात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.