पुणे शहर: सदाशिव पेठेत चव्हाण वाड्याला आग; जीवितहानी टळली.
Pune City, Pune | Oct 20, 2025 – सदाशिव पेठेतील १२९१, चव्हाण वाडा येथे आज रात्री आठ वाजता लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली. छतावरून लागलेली आग पाहून रहिवाशांनी तात्काळ बाहेर धाव घेतली. दलाच्या जवानांनी तत्परतेने तीन सिलेंडर बाहेर काढत सुमारे वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली. घरातील साहित्य जळाले असले तरी दुकानदारांनी माल बाहेर काढल्याने मोठे नुकसान टळले. आगीचे कारण समजू शकले नसून, कोणतीही