वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी 20 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहरात अत्यंत गंभीरित्या अपघात कमी करण्यासाठी ऑपरेशन यू टर्न राबविण्यात येत आहे. या ऑपरेशनमुळे अपघातातही मोठ्या प्रमाणात घट झाली. याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिली आहे