फलटण: माळजाई मंदिर फलटण येथे रस्त्यात एक जण भाजी घेताना अज्ञात चोरट्याने ६२ हजारांच्या सॅमसंग मोबाईलवर मारला डल्ला
माळजाई मंदिर फलटण येथे रस्त्यात एक जण भाजी घेत असताना अज्ञात चोरट्यांने ६२ हजारांचा सॅमसंग एस २३ मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार घडलाय.फलटण शहर पोलीसांनी सोमवारी सांगितले की रविवार दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास माळजाई मंदिर फलटण येथे रस्त्यावर भाजी घेताना अंधाराचा फायदा घेत शर्टच्या खिशातून ६२ हजारांचा सॅमसंग एस २३ मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेलाय. राजेश आळंदे रा. स्वामी विवेकानंदनगर फलटण यांनी फिर्याद दिली. पोलीस हवालदार बोबडे तपास करीत आहेत.