वाशिम: सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची घेतली शपथ
Washim, Washim | Oct 16, 2025 दिवाळी हा सण सणांचा राजा. हा सण पाच दिवस चालतो. विद्यार्थींना तर या काळात सुट्टीची जणु पर्वणीच असते. दिवाळी म्हणजे मिठाई, फराळ,भेटवस्तु ,किल्ले, आकाश कंदील इत्यादि गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. दिवाळीत अज्ञानाचा अंधकार दुर होउन ज्ञानाचा प्रकाश पसरावा यासाठी तेलाचे दिवे लावले जातात पण उत्साहाच्या भरात श्रीमंतीच्या प्रदर्शनापोटी हजारो रुपयांच्या फटाक्यांचा धुर करणे, विजटंचाईच्या काळात विजेच्या दिव्यांचा झगमगाट करने यातच भूषण मानले जाऊ लागले आहे.