खटाव: औंधचे संग्रहालय महाराष्ट्र राज्याचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ५२ कोटी सहा लाखांचा निधी
Khatav, Satara | Oct 2, 2025 सातारा जिल्ह्यातील औंध येथील संग्रहालय हे महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अमूल्य ठेवा आहे. संग्रहालयाच्या सर्वंकष विकास आराखड्यासाठी ५२ कोटी सहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुंबईत बैठक घेऊन दिले आहे. दरम्यान सरकारने निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल औंध येथील ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता समाधान व्यक्त केले असून सरकारला विशेष धन्यवाद दिले आहेत.